दिवाळीनिमित्ताने शिवशाही बसेस फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:16 AM2019-10-28T00:16:57+5:302019-10-28T00:18:23+5:30

पाडवा आणि भाऊबीजनिमित्ताने बसेसला प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने महामंडळाने विभागातून जादा बसेसेचे नियोजन केले आहे.

 Shivshahi buses flourish on Diwali | दिवाळीनिमित्ताने शिवशाही बसेस फुल्ल

दिवाळीनिमित्ताने शिवशाही बसेस फुल्ल

Next

नाशिक : पाडवा आणि भाऊबीजनिमित्ताने बसेसला प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने महामंडळाने विभागातून जादा बसेसेचे नियोजन केले आहे. महामार्ग तसेच नवीस सीबीएस स्थानकातून जास्तीत जास्त बसेस सोडण्यात आलेल्या असल्या तरी नियोजनाच्या कोणत्याही सूचना नसल्यामुळे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच प्रवाशांची वाहतूक करावी लागणार आहे. दरम्यान, शिवशाही बसेसला बुकिंग असल्यामुळे थेट येणाºया प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
दिवाळीत प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत असते. महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाºया या सणानिमित्ताने दरवर्षी जादा बससेचे नियोजन केले जाते. त्यानुसार जुने सीबीएससह नवीन सीबीएस आणि महामार्ग बससस्थानकातून बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शक्यता शिवशाही बसेस सुरू केलेल्या आहेत. नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, नाशिक- औरंगाबाद, नाशिक-कोल्हापूर आदी मार्गांवर सुरू असलेल्या शिवशाही बसेसचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आल्यामुळे अन्य प्रवाशांसाठी जागादेखील

उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. बस समोरून आली तरी बुकिंगमुळे अन्य प्रवाशांना थांबावे लागते. त्यातून प्रवासाला विलंब होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे शिवशाहीचे बुकिंग करूनही निर्धारित वेळेत बसेस धावत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्ग तसेच नवीस सीबीएस बसस्थानकात होणारी गर्दी लक्षात घेऊन येथे नियोजन करण्यात आले आहे. स्थानकावर अतिरिक्त कर्मचारी काम करणार आहेत. वारंवार ध्वनिक्षेपका-वरून सूचना देण्यात येणार आहेत, तर चालक-वाहकांना प्रवाशांशी सौजन्याने वागण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आंदोलनाचा धास्ती
कामगार संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला काहीशी चिंता निर्माण झालेली आहे. कामगार संघटनांनी असहकार आंदोलन पुकारले असून, भाऊबीजेला सामूहिक सुटी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून यापूर्वीच संबधितांना नोटीस बजावली आहे. भाऊबीजेला कोणालाही सुटी घेता येणार नसल्याने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले असून, सुट्टी घेणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिलेला आहे.
दिवाळी सणाचे नियोजन करण्याचे सोडून अधिकारी मात्र रविवारी दुपारपासूनच गायब होते. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणाºया अधिकाºयांना रविवारी दुपारपासून या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बसेसच्या नियोजनाबाबत एकाही अधिकाºयाकडून माहिती देता आली नाही. काही जबाबदार अधिकाºयांनी तर भ्रमणध्वनी घेण्याचीही तसदी घेतली नाही.
एसटीची हंगामी भाडेवाढ निश्चित
दिवाळीत बसेसला होणारी गर्दी लक्षात घेता महामंडळाने बसेसच्या भाड्यात हंगामी वाढ केलेली आहे. गेल्या गुरुवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आलेली हंगामी भाडेवाढ ही ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे. प्रतिटप्पा ७५ पैसे ते एक रुपया याप्रमाणे सदर भाडेवाढ असून, लांब पल्ल्याच्या बसेसच्या सध्याच्या तिकीट दरात कमीत कमी दहा रुपयांनी वाढ होणार आहे. रातराणी, निमआराम, वातानुकूलित शिवशाही बसेसच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. शिवनेरी बसेसच्या दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. शिवशाहीच्या एका टप्प्यास १०.२५ पैसे असलेले भाडे नव्या दरानुसार एक रुपयांनी वाढणार आहे.

Web Title:  Shivshahi buses flourish on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.