गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रकाश उत्सव : विविध धार्मिक कार्यक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:14 AM2017-12-22T01:14:01+5:302017-12-22T01:14:45+5:30

पंचवटी : शीख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांच्या ३५१व्या जयंतीनिमित्ताने पंचवटी गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते शिंगाडा तलाव श्री गुरुनानक दरबारपर्यंत गुरुग्रंथ साहिबाची सायंकाळी ४ वाजता सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली.

Shobayatra Prakash Utsit for the occasion of Guru Govindas Jayanti: Various religious programs | गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रकाश उत्सव : विविध धार्मिक कार्यक्र म

गुरु गोविंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रकाश उत्सव : विविध धार्मिक कार्यक्र म

Next
ठळक मुद्देसलग तीन दिवस धार्मिक कार्यक्रमपंजाब येथील ढोलपथक सहभागी

्रपंचवटी : शीख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांच्या ३५१व्या जयंतीनिमित्ताने पंचवटी गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते शिंगाडा तलाव श्री गुरुनानक दरबारपर्यंत गुरुग्रंथ साहिबाची सायंकाळी ४ वाजता सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. गुरुगोविंदसिंग यांची जयंती प्रकाश उत्सव म्हणून साजरी करण्यात येत असून, यानिमित्ताने पंचवटी व शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि.२१) सायंकाळी पंचवटी गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा येथून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत घोडेस्वार व अग्रभागी निशाणधारी पंचप्यारे सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या चारचाकी वाहनात गुरुग्रंथ साहिबा पोथी ठेवण्यात आली होती, तर शोभायात्रेचे खास आकर्षण म्हणून पंजाब येथील ढोलपथक सहभागी झाले होते.
पंचवटी गुरुद्वारा येथून निघालेली शोभायात्रा पुढे गजानन चौक, पाथरवट लेन, शिवाजीचौक, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे, रविवार कारंजा, रेडक्रॉस, नेहरू उद्यान रस्त्याने शालिमार, गंजमाळ, सारडा सर्कल आदी भागांतून काढण्यात येऊन शिंगाडा तलाव येथील गुरुनानक दरबार येथे समारोप करण्यात आला. पंचवटी गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा व गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार शिंगाडा तलाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तीन दिवस धार्मिक कार्यक्र म
शीख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांची जयंती प्रकाश उत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे.सोमवारी (दि.२५) गुरुगोविंदसिंग यांची जयंती असल्याने सलग तीन दिवस गुरुसिंग सभा पंचवटी येथे नगर कीर्तन व धार्मिक कार्यक्र म संपन्न होणार आहेत.

Web Title: Shobayatra Prakash Utsit for the occasion of Guru Govindas Jayanti: Various religious programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.