महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:55 AM2019-04-18T00:55:47+5:302019-04-18T00:56:19+5:30
भगवान महावीर स्वामी की जय, अधर्म का नाश हो, अहिंसा धर्म की जयच्या जयघोषात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती.
नाशिकरोड : भगवान महावीर स्वामी की जय, अधर्म का नाश हो, अहिंसा धर्म की जयच्या जयघोषात भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी दुर्गा उद्यानसमोरील जैन स्थानक येथून एका सजविलेल्या रथात भगवान महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा आर्टिलरी सेंटररोड, खोले मळा, लिंगायत कॉलनी, देवळालीगाव, सत्कार पॉर्इंट, सुभाषरोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको, मुक्तिधाममार्गे जैन स्थानकापर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेत सहभागी झालेल्या जैन बांधवांनी पांढऱ्या रंगाचा गणवेश व महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.
कार्यक्रमास संघपती डॉ. राजेंद्रकुमार मंडलेचा, डॉ. पी.एफ. ठोळे, कन्हैयालाल कर्नावट, मोहनलाल चोपडा, लालाभाऊ जैन, शंकरलाल बोथरा, सुभाष घिया, राजेंद्र धाडीवाल, संजय चोपडा, किरणमल धाडीवाल, सुनील बेदमुथा, विजय चोरडिया, अजित संकलेचा, संजय सुराणा, संदीप ललवाणी, विक्रम कर्नावट, संतोष धाडीवाल, संदीप कर्नावट, प्रदीप लोढा, अशोक कोचर, प्रदीप कोठारी, मिलिंद चोरडिया, प्रतीक संघवी, योगेश भंडारी, चंदुलाल लुणावत, अॅड. सुशील जैन, रोशन टाटिया, विनोद झांबड, योगेश भंडारी, भूषण सुराणा आदी सहभागी झाले होते.
जीवन चरित्रावर नाटिका
शोभायात्रेच्या सांगतेनंतर जैन स्थानकात प.पू. योगसाधनाजी म.सा. यांचे प्रवचन झाले. यावेळी पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर नाटिका सादर केली. भारतीय जैन संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी जैन भवनमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
४ भगवान महावीर जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली होती़ या मिरवणुकीत समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले़ विशेषत: लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून मिरवणुकीतच मतदान जनजागृती अभियान राबविले़ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले़