शोभायात्रेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:07 AM2018-03-11T00:07:59+5:302018-03-11T00:07:59+5:30
दिंडोरी : येथील विंध्यवासिनी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शोभायात्रेने मोठ्या उत्साहास प्रारंभ झाला.
दिंडोरी : येथील विंध्यवासिनी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शोभायात्रेने मोठ्या उत्साहास प्रारंभ झाला. दिंडोरी येथे विंध्यवासिनी मंदिरापासून देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी ढोल पथक तसेच अश्वांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीवर फुलांची उधळण करण्यात येत होती. फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात येत होते. या शोभायात्रेत नाशिक, दिंडोरी, वनारवाडी आदींसह अनेक ठिकाणचे भाविक सहभागी झाले होते. १२ ते १४ मार्च दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीविंध्यवासिंनी माता देवी मंदिर संस्थान दिंडोरीतर्फे करण्यात आले आहे. सोहळा यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष देवीदास दंडगव्हाण, उपाध्यक्ष भास्कर पवार, सचिव सुरेश गजानन दुसाने, खजिनदार कृपेश पवार, सहसचिव समीर मैंद, संजय राऊत, तुकाराम बत्तासे, दादा वाघ श्वेत जोशी, योगेश जोशी यांच्यासह विंध्यवासिनी भक्तमंडळ प्रयत्नशील आहेत.