साकोऱ्यात विद्यमान सदस्यांना धक्का, नवख्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:55 PM2021-01-19T22:55:52+5:302021-01-20T01:31:05+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या तिरंगी आणि अतिशय चुरसीच्या झालेल्या लढतीत मतदारांनी विद्यमान सदस्यांना नाकारून प्रस्तापितांना जोरदार धक्का देत नवख्या उमेदवारांना कौल दिल्याने त्रिशंकू निकाल दिला आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या तिरंगी आणि अतिशय चुरसीच्या झालेल्या लढतीत मतदारांनी विद्यमान सदस्यांना नाकारून प्रस्तापितांना जोरदार धक्का देत नवख्या उमेदवारांना कौल दिल्याने त्रिशंकू निकाल दिला आहे.
साकोरा ग्रामपंचायतीसाठी एकूण १७ जागांसाठी तीन पॅनलतर्फे एकूण ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी बोरसे यांचे पती महेंद्र बोरसे यांच्या बाळनाथ महाराज पॅनलतर्फे एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. पैकी ८ उमेदवार विजयी झाले तर जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या आपला पॅनलतर्फे १७ उमेदवारांपैकी अवघे ६ उमेदवार विजयी झाले तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रमेश बोरसे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले माजी उपसरपंच अतुल पाटील यांनी वेगळी चूल मांडून साकोरा विकास आघाडी पॅनलची निर्मिती करून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले होते; मात्र त्यांना प्रभाग क्रमांक दोनमधून स्वत:सह अवघे तीन उमेदवार विजयी करता आले. ग्रामपंचायतमध्ये इतर दोन पॅनलला सत्ता स्थापनेसाठी या तीन सदस्यांची गरज भासणार आहे.
--------------
विजयी उमेदवार : प्रभाग क्रमांक एक मधून बाळनाथ महाराज पॅनलचे प्रशांत बोरसे (२४० मते) या तरुण उमेदवाराने बाजी मारून माजी सदस्य संजय बोरसे (१७९) यांचा ६१ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण स्त्रीसाठी आपला पॅनलच्या सोनाली सूर्यवंशी (२३६) यांनी बाळनाथ महाराज पॅनलच्या सुरसे मीराबाई (१६६) यांचा ७० मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये अतुल पाटील (३२७) यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत बोरसे (१८४) यांचा पराभव केला. माजी सरपंच संजय सुरंसे (१७९) यांचा तसेच माजी सरपंच अनिता सोनवणे यांचे पती देवदत्त सोनवणे (१९५) यांचा घनश्याम सुरसे (२५५) या तरुण नवीन उमेदवाराने ६० मतांनी पराभव केला. वनिता तेजूल बोरसे (२५९) यांनी प्रतिस्पर्धी माजी उपसरपंच संदीप बोरसे यांच्या पूजा बोरसे (१६९) यांचा व मीराबाई सुंदरसे (२०३) यांचा ५६ मतांनी पराभव केला.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये माजी सरपंच दादा बोरसे (३००) यांचा माजी सदस्य किरण बोरसे (४८६) यांनी पराभव केला. याच प्रभागात दोन मित्र अन्ना काटकर (३५७) आणि राजेंद्र भामरे (३६२) यांच्यात जोरदार लढत होऊन भामरे यांनी विजय मिळवला. माजी सरपंच ऊर्मिला निकम (२९९) यांचा मनीषा बोरसे (३९०) यांनी ९१ मतांनी दारुण पराभव केला. प्रभाग क्र. चारमध्ये सावित्रीबाई सुलाने यांनी ४९५ मते घेऊन तसेच ताराबाई सोनवणे यांनी ४६९ आणि वाल्ह्याबाई कदम ४४६ मते घेऊन विजय मिळवला आहे. प्रभाग पाचमधून भालचंद्र बोरसे (५०८), दीपाली मोरे (५४५), सोनाली अहिरे (६५१) मतांनी विजयी तर प्रभाग क्र. सहा मधून नरहरी भोसले ४०८, यशोदा डोळे ४००, वंदना दुरडे ४१५ मतांनी विजयी झालेल्या आहेत.