पूर्व भागातील अटीतटीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:16+5:302021-01-19T04:18:16+5:30
हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भास्कर कराड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास परिवर्तन पॅनल तर गंगाधर धात्रक, वाल्मीक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. ...
हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भास्कर कराड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास परिवर्तन पॅनल तर गंगाधर धात्रक, वाल्मीक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत प्रस्थापितांचा धुव्वा उडवत मतदारांनी महाविकास परिवर्तन पॅनलच्या पारड्यात मते टाकल्याने सर्वच्या सर्व उमेदवार निवडून दिले. महाविकासचे पूर्ण पॅनल विजयी झाल्याने ७-० असा निकाल लागला.
जाखोरी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी विश्वास कळमकर यांच्या ग्रामसमृद्धी पॅनलने पाच जागा जिंकून सत्ता कायम ठेवली, तर जनसेवा पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
चांदगिरी ग्रामपंचायतीत श्रीविकास पॅनल पाच जागा जिंकून विजयी झिले, तर सत्ताधारी परिवर्तन पॅनलला फक्त दोन जागा राखता आल्या. रमेश कटाळे यांच्या श्रीविकास पॅनलने पाच जागा जिंकून सत्तांतर घडविले. याच पॅनलची एक जागा रामहरी तुकाराम कटाळे यांची निवड बिनविरोध झाली होती.
शिलापूर येथे हरिश्चंद्र बोराडे यांच्या नेतृत्वाखालील नम्रता व त्यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली. विरोधी परिवर्तन पॅनलचे पाच तर सत्ताधारी नम्रता पॅनलचे चार उमेदवार निवडून आले.