मुंबई रिटर्नचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:06 PM2020-05-19T22:06:06+5:302020-05-20T00:03:50+5:30

निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.

The shock of the Mumbai return | मुंबई रिटर्नचा धसका

मुंबई रिटर्नचा धसका

Next
ठळक मुद्देनिफाडकरांची वाढली चिंता; तालुक्यातील रुग्णसंख्या १५ वर

सायखेडा : निफाड तालुक्यात सलग चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे मुंबई रिटर्न असल्याने निफाडकर धास्तावले आहेत. त्यामुळे निफाडच्या सीमेवर आणि गावातील गल्लोगल्ली मुंबईहून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाऊ लागली आहे.
कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तरीही तालुक्यात आजमितीस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांत ओझर, विष्णुनगर, उगाव, सुकेणे येथे आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईवरून आले असल्याने निफाडकरांनी या मुंबईकरांचा चांगलाच धसका घेतला
आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळून आला होता.
त्यानंतर मात्र त्याच्या संपर्कातील सर्वच रु ग्ण निगेटिव्ह आल्याने मोठी काळजी मिटली होती.
त्यानंतर आढळून आलेले
पॉझिटिव्ह रुग्ण लासलगाव परिसरातच वेगवेगळ्या गावांमध्ये निघाले.
तालुक्यातील दुसºया भागात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हते. त्यामुळे प्रशासनास काम करताना अगदी सोपे जात होते तसेच नागरिकही काळजीत नव्हते; मात्र चार दिवसांपूर्वी ओझर येथे आढळून आलेला रुग्ण, दुसºया दिवशी सुकेणे येथे आढळून आलेला रुग्ण हे दोघे मुंबई येथे बँकेत कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.
सदर रुग्ण घरी आल्यानंतर आजारी पडला. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. त्यानंतर
उगाव येथे आढळून आलेला पॉझिटिव्ह रुग्णही मुंबईवरून
आला आहे, तर विष्णुनगर येथे आढळून आलेला रुग्णाचेसुद्धा
मुंबई कनेक्शन आहे. त्यामुळे
निफाड तालुक्यात मुंबईवरून आणखी किती नागरिक निफाड तालुक्यात आले आहेत, यावर प्रशासनातही खल सुरू झाला
आहे.
मुंबईहून येणाऱ्यांना रोखा
निफाड तालुक्यातील अनेक लोक वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक लोक खेड्याकडे येत आहेत. येताना मात्र योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्यामुळे ते इकडे आल्यानंतर आजारी पडतात आणि पर्यायाने त्यांना कोरोना रोगाची लागण झालेली दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईहून येणाºयांना रोखावे अथवा त्यांची तातडीने तपासणी करुन त्यांना क्वॉरण्टाइन करावे, अशी मागणी होत आहे. सदर लोकांना मुंबईवरून कसे सोडले जाते, त्यांना सोडताना त्यांची योग्य चाचणी केली जाते किंवा नाही, ्रअशी शंका तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केली आहे.

Web Title: The shock of the Mumbai return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.