पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:22 AM2018-12-11T01:22:29+5:302018-12-11T01:22:47+5:30

रस्त्यात उभी असलेली चारचाकी बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाºयाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचाºयाच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाºया चौघा महिलेसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक केली आहे.

 Shock the police officer | पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

Next

पंचवटी : रस्त्यात उभी असलेली चारचाकी बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा राग आल्याने पोलीस कर्मचाºयाला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचाºयाच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात राहणाºया चौघा महिलेसह पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक केली आहे.
आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, थिटमे, आवारे, वाळुंज असे मुंबई-आग्रारोडवरील दत्तात्रयनगर येथे रविवारी (दि.९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीस गस्तीवर असताना संशयित आरोपी राजू शंकर अहिरे याने त्याच्या ताब्यातील तवेरा कार रस्त्यावर उभी असताना पाटील यांनी वाहतुकीला अडथळा होत असल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करा, असे सांगितल्याचा संशयित अहिरे व त्यांच्यासमवेत असलेल्या मोहिनी अहिरे, आश्लेषा अहिरे, सीमा अहिरे, विमलबाई वाघ (सर्व राहणार) शांतीनगर यांना राग आल्याने त्यांनी पाटील यांच्या युनिफॉर्मच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच शिवीगाळ करून पाटील यांच्यासमवेत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना शिवीगाळ केली.

Web Title:  Shock the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.