धक्कादायक : विभागीय आयुक्तांनी दिले कारवाईचे निर्देश औद्योगिक सांडपाणी मनपाच्या गटारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:03 AM2018-04-27T01:03:56+5:302018-04-27T01:03:56+5:30
नाशिक : सातपूर येथील कार्बन कार्पोरेशनजवळ काही कंपन्यांनी एकत्र येऊन एका चेंबरमधून थेट महापालिकेच्या भुयारी गटारीत सोडलेले प्रदूषित पाणी, नासर्डीला भरावाने घातलेली ‘मगरमिठी’, तर आगरटाकळी येथे ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा.
नाशिक : सातपूर येथील कार्बन कार्पोरेशनजवळ काही कंपन्यांनी एकत्र येऊन एका चेंबरमधून थेट महापालिकेच्या भुयारी गटारीत सोडलेले प्रदूषित पाणी, नासर्डीला भरावाने घातलेली ‘मगरमिठी’, तर आगरटाकळी येथे ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा.... शहरातील नद्या प्रदूषणमुक्तीचा विषय कितीही ऐरणीवर आला आणि उच्च न्यायालयाने बडगा दाखवून शासकीय यंत्रणांना सुधारणा करायला लावल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नदीपात्रांची अवस्था जैसे थे असल्याचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात आढळले आहे. प्रदूषणावरून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी देताना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासह अन्य सदस्यांनी गोदावरी आणि नासर्डी नदीच्या काही भागांची पाहणी केली.
आॅनलाइन ट्रिटमेंट चालू, पण...
गोदावरी नदीपात्रात जाणाºया औद्योगिक सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी नीरीने सोमेश्वरजवळ नदीपात्रालगतच्या नाल्यावर आॅनलाइन ट्रिटमेेंट प्लॅँट हा झाडांच्या मदतीने शुद्धीकरणाचा अनोखा प्रयोग राबविला होता. मात्र नाल्याकडे येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने या प्लॅँटच्या बाहेरून हे पाणी नदीपात्रात जात आहे. त्यामुळे फेसही कायम असल्याचे पाहणी दौºयात आढळले. सध्या हा प्लॅँट देखभाल दुरस्तीसाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आयुक्त आवाक
नासर्डी नदीलगत म्हणजे किनारा हॉटेल ते दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या पाठीमागील बाजूने नदीकाठालगत विकसित करण्यात आलेला रस्ता हा नदीचा भाग असल्याचा संशय या दौºयात व्यक्त करण्यात आला असून, हा रस्ता कसा काय तयार करण्यात आला याबाबत अभ्यास केला जाणार आहे.