धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार!

By अझहर शेख | Published: March 4, 2023 06:20 PM2023-03-04T18:20:02+5:302023-03-04T18:21:04+5:30

या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

shocking an eight year old girl was found dead under a mini school bus in nashik | धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार!

धक्कादायक! नाशिकमध्ये आठ वर्षीय चिमुकली मिनी स्कूल बसखाली सापडून ठार!

googlenewsNext

नाशिक : शाळा सुटल्यानंतर स्कुल मिनी बसमध्ये (टेम्पो ट्रॅव्हलर) सर्व विद्यार्थ्यांसमवेत बसून नेहमीप्रमाणे आठ वर्षीय चिमुकली अपेक्षा नवज्योत भालेराव हीदेखील घराजवळ उतरली. यावेळी ती पायी घराकडे जात असताना मिनी बसच्या पाठीमागून वळाली असता त्याचवेळी चालकाने वाहन मागे घेतल्याने अपेक्षा टायरखाली सापडून जागीच मृत्यूमुखी पडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जेलरोड भागातील पवारवाडी येथील हरी गोकुळधाम सोसायटीत जाणारी आठ वर्षांची मुलगी अपेक्षा भालेराव शुक्रवारी (दि.३) सकाळी साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे स्कुल बसमधून (एम.एच १५ जीव्ही ३५४२) साने गुरुजीनगर येथील नवीन मराठी शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर त्या स्कूलबस मधून सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास बसचालकाने तिल घराजवळ उतरविले. यावेळी ती बस मधून उतरून पायी घराकडे जात होती. यावेळी तीने बसच्या पाठीमागून वळण घेतले असता त्याचवेळी स्कूल बस चालक प्रवीण दगा शेजवळ याने रिव्हर्स गिअर टाकल्याने बस वेगाने पाठीमागे आली आणि दुर्दैवाने अपेक्षाला जोरदार धक्का बसल्याने ती गतप्राण झाली. घटनेची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक तसेच अन्य स्कुल बसचालकांनी नाशिकरोडच्या रूग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित चालक प्रवीण शेजवळविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक करून शनिवारी (दि.४) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अपघातग्रस्त स्कुल मिनी बस ही वाकचौरे नामक व्यक्तीच्या मालकीची असून या वाहनावर शेजवळ हे वाहनचालक म्हणून नोकरी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

...अन् काळाने घाला घातला!

शाळा सुटल्यानंतर नेहमीच्या वेळेपेक्षा तुमच्या घरी पोहचण्यास पंधरा ते वीस मिनिटे उशीर लागेल, असे स्कुल बस चालक शेजवळ याने फोनवरून अपेक्षाच्या आईला माहिती कळविली होती. यामुळे जेव्हा स्कुल बस पवारवाडी येथे पोहचली तेव्हा, तिला घेण्यासाठी आई खाली उतरून येऊ शकली नाही. एरवी दररोज तिला घेण्यासाठी आई घरातून खाली उतरून येत असे; मात्र शुक्रवारी उशीर होणार असल्याने त्यांना खाली येणे श्यक्य झाले नाही. परिणामी काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे.

शनिवारी अंत्यसंस्कार!

चिमुकल्या अपेक्षाचा मृतदेह शनिवारी सकाळी भालेराव कुटुंबियांनी जिल्हा शासकिय रुग्णालयातून ताब्यात घेतला. यानंंतर शोकाकुल वातावरणात जेलरोड-दसक भागात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपेक्षा शाळेत तीसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार असल्याने ती सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी होती. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shocking an eight year old girl was found dead under a mini school bus in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.