धक्कादायक : आयुक्त जाधव यांचा नकार; २४ उपकरणे उपलब्ध नाशिकमध्ये पंधरा व्हेंटिलेटर्स पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:25 AM2020-09-05T01:25:47+5:302020-09-05T01:26:04+5:30

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा मात्र, चव्हाट्यावर येत आहेत. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे आढळले आहे.

Shocking: Commissioner Jadhav's refusal; Fifteen ventilators available in Nashik with 24 equipments available | धक्कादायक : आयुक्त जाधव यांचा नकार; २४ उपकरणे उपलब्ध नाशिकमध्ये पंधरा व्हेंटिलेटर्स पडून

धक्कादायक : आयुक्त जाधव यांचा नकार; २४ उपकरणे उपलब्ध नाशिकमध्ये पंधरा व्हेंटिलेटर्स पडून

Next

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा मात्र, चव्हाट्यावर येत आहेत. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. मात्र आयुक्त कैलास जाधव यांनी याचा इन्कार केला आहे. शहरात व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात म्हणजेच २४ शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्सचे बेड मिळत नाही. महापालिकेच्या रुग्णालयातदेखील अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्ससाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अशा स्थितीतदेखील महापालिकेच्या नाशिकरोड येथील पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे वृत्त आहे. केवळ २३ किलो लिटर दाबाची टाकीच उपलब्ध होत नसल्याने गेल्या महिनाभरापासून हे व्हेंटिलेटर्स पडून आहेत. खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स असून उपयोगात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
अशाप्रकारे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांच्या उपचाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांनी शहरात व्हेंटिलेटर्सची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले
आहे. शुक्रवारी (दि.३) रात्रीपर्यंत शहरात २४ व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले असे ते म्हणाले. मुळात कोरोनात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्के आहे. अगदी दोन टक्के रुग्णांनाच व्हेंटिलेटरची गरज भासते. त्यामुळे गरजेनुसार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत, नागरिकांनी चिंता करू नये, असेही ते म्हणाले.
नातेवाइकांना बाहेर काढावा लागला मृतदेह
महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह देण्यासाठी कर्मचारीच नसल्याने नातेवाइकांना पीपीई किट घालून रुग्णालयात जावे लागले आणि त्यांनाच तो मृतदेह बाहेर आणावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाºयाला नोटीस बजावण्याचे
आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. हा कर्मचारी कामावर न
येता परस्पर रजेवर राहिल्याने हा प्रकार घडल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Shocking: Commissioner Jadhav's refusal; Fifteen ventilators available in Nashik with 24 equipments available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.