सोशल मीडियावर फटकारे, हास्यफवारांचा माहोल

By admin | Published: February 18, 2017 11:31 PM2017-02-18T23:31:25+5:302017-02-18T23:31:46+5:30

सोशल मीडियावर फटकारे, हास्यफवारांचा माहोल

Shocking on social media, humorist | सोशल मीडियावर फटकारे, हास्यफवारांचा माहोल

सोशल मीडियावर फटकारे, हास्यफवारांचा माहोल

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीत यंदा सोशल नेटवर्किंग वॉर चांगलेच रंगत असून, व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपमध्ये चर्चा, फटके आणि फटाक्यांसह टीकेची झोड उठविली जात आहे. या हास्यफवाऱ्यांची मतदार चांगलीच मजा घेत असले तरी गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवरून परस्पर वरोधी टीकेची पातळी घसरल्याचे दिसून येत असल्याने अशा प्रकारे विकृतीचे दर्शन घडविणाऱ्या पोस्टवर मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुकींच्या सभांसाठी कार्यकर्ते पाहिजे असतात. तसेच मोर्च्यांसाठी, प्रचारासाठी, झेंडे लावण्यासाठी, घोषणा देण्यासाठी विविध पक्षांना कार्यकर्ते पाहिजे असतात. मोर्चा काढताना लाठी खाण्यासाठी, केसेस अंगावर घेण्यासाठी कार्यकर्ता पाहिजे असतो. मग निवडणुकीच्या तिकिटासाठीच नातेवाईकच का पाहिजे, असा खोचक सवाल काही सोशल मीडियाच्या विविध पोस्टमधून नाराज कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. अन्य व्यंगात्मक पोस्टमधून व्यंगचित्रासमवेत विविध काव्यपंक्तींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांच्या जाहिरातींचे विडंबण केले जात आहे.  नोटबंदी, निर्यातबंदी, दुष्काळातील स्थिती, शेतकरी आत्महत्त्या, नुकसानभरपाई, शेतमालाला हमी भाव अशा विविध प्रश्नांची सरबत्ती सोशल मीडियावरून सरकारवर निशाणा साधला जातो आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shocking on social media, humorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.