धक्कादायक...! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:59+5:302021-03-31T04:14:59+5:30

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास ...

Shocking ...! As soon as he heard the news of his wife's death, his husband also embraced death | धक्कादायक...! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

धक्कादायक...! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

Next

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा आणि मुलगीदेखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयांतच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.

मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतःला सावरत वडिलांना मोबाइलवर संपर्क करून ही दुःखद वार्ता कळविली.

बराच वेळ होऊनही वडील रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबीयांना फोन करून वडिलांची माहिती घेण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी रवींद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली. यावेळी एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते. यावेळी रुग्णालयातील अन्य नागरिकांनी त्यांच्याजवळ जात समजावून धीर देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत भाजपा सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकीत जाऊन घटनेची प्राथमिक माहिती दिली. सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

----इन्फो---

मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब

मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मोठा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा हादेखील रोजंदारीवर एका खासगी कारखान्यात कामाला जातो. पवार यांचे अत्यंत सामान्य गरीब कुटुंब होते. या कुटुंबाचा आधारच आता नियतीने हिरावून घेतल्याने भावंडांवर आकाश फाटले आहे.

Web Title: Shocking ...! As soon as he heard the news of his wife's death, his husband also embraced death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.