धक्कादायक; नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:20 AM2021-08-24T04:20:05+5:302021-08-24T04:20:05+5:30
सिन्रर तालुक्यातील ठाणगाव तसेच नाशिक शहरातील तिडके कॉलनीतील रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांच्या डेल्टा व्हेरिएंट तपासणीसाठी ...
सिन्रर तालुक्यातील ठाणगाव तसेच नाशिक शहरातील तिडके कॉलनीतील रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांच्या डेल्टा व्हेरिएंट तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. गेल्या एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त झाला असून दरम्यानच्या काळात हे रुग्ण घरी देखील परतले आहेत. त्यातील एका रुग्णाचा शोध घेण्यात आला असून त्यास गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर अन्य एका रुग्णाचा शोध घेतला जात आहे. या रुग्णाचा शोध घेऊन त्याच्यावरही आरेाग्य विभाग लक्ष केंद्रीत करणार आहे.
दरम्याना, महापालिकेच्या आरेाग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून आलेल्या रुग्णाचे कुटुंबीय तसेच आजूबाजूच्या रहिवाशांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. यापैकी कुणाला काही त्रास हाेत असल्यास तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. परिसरात आरेाग्य तपासणी मोहीमही राबविली जाणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी १५५ रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्यातील जिल्ह्यातील ३० रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे व्हेरिएंट आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. सुदैवाने हे सर्व रुग्ण ठणठणीत असल्याने तसेच डेल्टा हा व्हेरिएंट फारसा घातक नसल्यामुळे धोका टळला होता. आता मात्र डेल्टा प्लसचा व्हेरिएंट आढळल्यामुळे या दोन्ही रुग्णांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.