हृदयद्रावक : गणरायाचे विसर्जन करताना नाशिकमध्ये दोघे मित्र नदीत बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:36 PM2024-09-18T14:36:41+5:302024-09-18T14:37:09+5:30

शहरात मंगळवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र लहान-मोठ्या विसर्जन मिरवणूकांचे वातावरण बघावयास मिळत होते.

Shocking: Two friends drowned in the river in Nashik while immersing Ganaraya.  | हृदयद्रावक : गणरायाचे विसर्जन करताना नाशिकमध्ये दोघे मित्र नदीत बुडाले

हृदयद्रावक : गणरायाचे विसर्जन करताना नाशिकमध्ये दोघे मित्र नदीत बुडाले

संजय शहाणे

नाशिक : अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पाथर्डी शिवारात मंगळवारी (दि.१७) सायंकाळी गेलेल्या दोघा मित्रांचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ओमकार चंदक्रांत गाडे (१७), स्वयंम भय्या मोरे (१८, दोघे रा. साई अव्हेन्यू, ज्ञानेश्वरनगर) अशी दोघांची नावे आहेत.

शहरात मंगळवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र लहान-मोठ्या विसर्जन मिरवणूकांचे वातावरण बघावयास मिळत होते. ओंकार व स्वयंम हे दोघेही गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पाथर्डी शिवारातून वाहणाऱ्या वालदेवी नदीकाठी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गेले होते. गणरायाच्या मुर्तीचे पाण्यात विसर्जन करताना या दोघांना नदीपात्राच्या खोलीचा व पाण्याच्या प्रवाहचा अंदाज न आल्याने दोघेही प्रवाहात वाहून जात गटांगळ्या खाऊ लागले. आजुबाजुला असलेल्या लोकांच्या जेव्हा हा प्रकार लक्षात आला, असता त्यांनी आरडाओरड केली. यावेळी काहींनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्रप्रमुख लिडींग फायरमन प्रमोद लहामगे, मोहियोद्दीन शेख मुकुंद सोनवणे, प्रशिक्षणार्थी किरण हनवते, इंद्रजीत पाटील, केशव सानप व बंबचालक गणेश गायधनी यांनी घटनास्थळाच्यादिशेने धाव घेतली.

तातडीने रबरी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात उतरून बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनटे शोध घेतल्यानंतर गळाला पहिला मृतदे लागला. त्यानंतर अर्धा तास नदीपात्र पिंजल्यानंतर दुसरा मृतदेह गळाला लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिससुद्धा घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Shocking: Two friends drowned in the river in Nashik while immersing Ganaraya. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक