प्रेमच्या बुटामुळे वाचणार सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:38+5:302021-09-27T04:16:38+5:30

नाशिक : बुटातून निर्माण होणाऱ्या तरंगाद्वारे सरपटणाऱ्या प्राण्यांना सावधान करत त्यांना ट्रेकरच्या पायाखाली येण्यापासून वाचवणारा बुट साकारण्याची किमया डी. ...

The shoes of love will save the lives of reptiles! | प्रेमच्या बुटामुळे वाचणार सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव!

प्रेमच्या बुटामुळे वाचणार सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव!

Next

नाशिक : बुटातून निर्माण होणाऱ्या तरंगाद्वारे सरपटणाऱ्या प्राण्यांना सावधान करत त्यांना ट्रेकरच्या पायाखाली येण्यापासून वाचवणारा बुट साकारण्याची किमया डी. डी. बिटको बॉईज हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या प्रेम गायकवाडने केली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योगिक विभागातर्फे मानक या पोर्टल खाली घेतल्या जाणाऱ्या इन्फायर अवॉर्ड या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रेमच्या या प्रकल्पाची निवड झाली आहे. ट्रेकरसाठी बनवण्यात आलेल्या या खास बुटामुळे जैवविविधतेचा ऱ्हास टळणार आहे.

ट्रेकर्स जेव्हा दऱ्याखोऱ्यात, डोंगरावर ट्रेकिंगला जातात, त्यावेळी त्यांच्या पायाखाली सरपटणारे अनेक जीव मृत्यूमुखी पडतात. याबाबत एका सर्व्हेक्षणात नोंद करण्यात आली आहे. सरपटणाऱ्या या प्राण्यांचा जीव कसा वाचवता येईल, यासाठी या बुटाची निर्मिती केली आहे. बुटाला सेंन्सर व सर्किट बसवून ठराविक तरंग लांबीचे ध्वनीची निर्मिती केले जातात व विशिष्ट तरंग लांबीचे पुढे आणि मागे प्रकाशही निर्माण केला जातो. जेणेकरून ज्याच्या पायात बुट आहे. त्यांच्या आजुबाजुच्या परिसरातील सरपटणारे साप, किडे दक्ष होतील व पायाखाली येण्यापासून त्यांचा बचाव होईल. बुटाची निर्मिती प्रेमने स्वत: केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात नववीत असताना या प्रकल्पाचे जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यात आले होते. त्यातून राज्यस्तरावर प्रकल्प निवडला गेला. ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२१ दरम्यान दिल्ली येथे विज्ञान व प्रोद्योगिक विभागातर्फे राष्ट्रीय प्रकल्प भरविण्यात आलेल्या स्पर्धेत तीन स्तरावर प्रकल्पांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत परिक्षण झाले. महाराष्ट्रातील फक्त चार प्रकल्पांची निवड या स्पर्धेत करण्यात आली होती. त्यात प्रेमच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

---- फोटो : आर ला : २६ प्रेम १ आणि प्रेम २ --------

Web Title: The shoes of love will save the lives of reptiles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.