दुकान फोडून ७७ हजारांचे टायर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:58 AM2019-07-15T01:58:01+5:302019-07-15T01:58:57+5:30
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
दुकानाच्या गाळ्यात विक्रीसाठी १२ हजार रुपये किमतीचे ‘जेके’ कंपनीचे १२ हजार रुपये किमतीचे १५ नग, ६५ हजार रुपयांचे गुडइयर, योकोहम, ब्रीजीयेन कंपनीचे २६ टायर असे एकूण ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची फिर्याद राजेंद्र जगदीश मालविया (५८) यांनी मुंबईनाका पोलिसांकडे केली आहे.
चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.