दुकाने निरिक्षक निशा आढाव यांना लाच स्विकारताना अटक
By नामदेव भोर | Published: June 15, 2023 06:10 PM2023-06-15T18:10:48+5:302023-06-15T18:11:29+5:30
बालकामगार शोषणाचा गुन्हा टाळण्यासाठी मागितली लाच.
नाशिक : शहरात बालकामगार विरोधी मोहीम राबविली जात असताना कामगार उपायुक्तालयातील दुकाने निरिक्षक निशा बाळासाहेब आढाव यांना बाल कामगाराविरोधी शोषणाचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१५) रंगेहाथ पकडले आहे.
लाचलुचपक प्रतिंबधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका हॉटेल व्यवसायिक शहरात चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून या प्रकरणात आढाव यांनी केलेल्या तपासणी दरम्यान नीरंक अहवाल पाठवून बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल व्यावसायिकाकडे लाचलुचपक प्रतिंबधक विभागाच्या पंचासमक्ष ५ हजार रुपयां लाचेची मागणी करून कामगार उपायुक्त कार्यालयात पंच साक्षीदार समक्ष लाच स्विकारताना सापळा अधिकारी पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पथक पोलिस नाईक मनोज पाटील, अजय गरुड, शितल सूर्यवंशी यांनी रंगेहाथ पकडले असून सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.