चौकटीत राहूनच करा वस्तूंची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:44 PM2020-03-25T22:44:01+5:302020-03-25T22:44:19+5:30
इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे व इतर सदस्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने व गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीचे ठिकाणे तसेच औषधालये या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ तसेच चौकोन आखण्यात असून, त्यात उभे राहूनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना यांनी दिले आहेत.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे व इतर सदस्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने व गर्दी टाळून करता यावी यासाठी प्रत्येक किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीचे ठिकाणे तसेच औषधालये या ठिकाणी रंगाने एक मीटरच्या अंतरावर वर्तुळ तसेच चौकोन आखण्यात असून, त्यात उभे राहूनच वस्तू खरेदी करण्याचे आदेश ग्रामस्थांना यांनी दिले आहेत. या नियमाचे जो उल्लंघन करेल अशा व्यक्तीस कलम १४४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सरपंच सोनवणे यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सोयीस्कर व गर्दी न करता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी तसेच कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून सरंक्षण व्हावे यासाठी प्रत्येक दुकानासमोर एक मीटरच्या अंतरावर रंगाने वर्तुळ तसेच काही ठिकाणी चौकटी काढल्या आहेत. या चौकटीत व वर्तुळातुनच ग्रामस्थांनी खरेदी करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस या महाभयंकर विनाशकाली आजारपासुन आपले स्वत:चे आपल्या गावाचे ,आपल्या देशाचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. यामुळे आपल्या गावातील कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी दिलेल्या वेळेनुसारच बाहेर जावे. यासाठी गोंदे ग्रामपंचायतीच्या वतीने भाजीपाला, मेडिकल, दवाखाने, गॅस दुकान व किराणा दुकाने यांच्या समोर वर्तुळ मारले आहे.