सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:44 PM2018-09-30T18:44:30+5:302018-09-30T18:45:57+5:30
सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वसंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संघाला एक लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला आहे.
सिन्नर : तालुका खरेदी-विक्री संघाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वसंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संघाला एक लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला आहे.
आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. खरेदी-विक्री संघाच्या तालुक्यात ७ शाखा असून, त्यामार्फत सभासद व शेतकऱ्यांना रासायनिक खते तसेच स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. यातून संस्थेने सर्व खर्च व तरतुदी वजा जाता एक लाख ३० हजार ७२७ रुपये निव्वळ नफा मिळविल्याचे आव्हाड यांनी सांगितले. व्यवस्थापक संपत चव्हाणके यांनी अहवालाचे वाचन केले. संस्थेने कीटकनाशक औषधे व बी-बियाणे विक्री व्यवसाय सुरू करावा, अशी सूचना सभासदांनी केली. त्याचप्रमाणे सन २०१७-१८ सालात महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मार्फत १२,८३३ क्विंटल मका १४२५ रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी केलेला असून, शेतकºयांची देयके जमा केली आहेत. यावेळी खरेदी-विक्री संघाचे सभासद उदय सांगळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेस संघाचे उपाध्यक्ष छबू थोरात, कचरू गंधास, विठ्ठल राजेभोसले, फकिरराव हिरे, रामचंद्र सकट, अरुण वारुंगसे, किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.