शॉर्टसर्किटमुळे दोन दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:34 PM2019-09-17T22:34:45+5:302019-09-18T00:30:32+5:30

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरणपूररोडवरील दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आला.

Shop two shops due to shortsightedness | शॉर्टसर्किटमुळे दोन दुकाने खाक

शॉर्टसर्किटमुळे दोन दुकाने खाक

Next
ठळक मुद्देदोन तासांनंतर आग आटोक्यात

नाशिक : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शरणपूररोडवरील दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या सहाय्याने तासाभरात आग नियंत्रणात आणली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील राका कॉलनीजवळ असलेल्या फेमस कुल्फी आणि त्याशेजारील वीवीएस मोबाइल शॉपी ही दोन दुकाने शॉर्टसर्किट होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यास जवानांनी सुरुवात केली. आगीचा स्रोत दुकानांच्या आतमधील बाजूने असल्यामुळे बंद दुकानांचे शटर उचकटणे गरजेचे होते. त्यामुळे जवानांनी तत्काळ मुख्यालयाशी संपर्क साधून अतिरिक्त मदत मागितली. यानंतर हॅजमेट रेस्क्यू व्हॅन व मेगा बाउजर या दोन बंबांसह वाढीव जवान घटनास्थळी दाखल झाले. लिडिंग फायरमन श्याम राऊत, बंबचालक देवीदास इंगळे, उदय शिर्के, तानाजी भास्कर, किशोर पाटील, घनश्याम इंफाळ, अनिल गांगुर्डे, राजेंद्र पवार, तौसिफ शेख यांनी शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली.
आग विझविण्यात यश
मध्यरात्री दीड वाजता आग विझविण्यात जवानांना यश आले. कुल्फीच्या दुकानामधील मोठे फ्रीजसह अनेक वस्तू तसेच मोबाइल शॉपीमधील महागडे मोबाइल आगीमध्ये खाक झाले. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Shop two shops due to shortsightedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.