शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराचा ‘अंगठा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:26 PM2018-09-29T22:26:46+5:302018-09-29T22:28:01+5:30

नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. अशीच युक्ती मांडवड येथील स्वस्त धान्य दुकानदार करत असून, शेकडो लाभार्थींचे अंगठे ई-पॉस मशीनवर उमटवून त्यांना प्रत्यक्षात ‘अंगठा’च दाखविला जात असल्याची तक्रार पुन: एकदा तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

The shopkeeper's thumb to ration card holder | शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराचा ‘अंगठा’

शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराचा ‘अंगठा’

Next
ठळक मुद्देरेशनचे धान्य मिळेना : ई-पॉस मशीनवरून फसवणुकीच्या तक्रारी

नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. अशीच युक्ती मांडवड येथील स्वस्त धान्य दुकानदार करत असून, शेकडो लाभार्थींचे अंगठे ई-पॉस मशीनवर उमटवून त्यांना प्रत्यक्षात ‘अंगठा’च दाखविला जात असल्याची तक्रार पुन: एकदा तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरपंच गंगूबाई आहेर यांनी गांधी जयंती दिनी (२ आॅक्टोबर) ग्रामसभेवर सदर विषय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांच्या बोटांचे ठसे मशीनवर नोंदणीसाठी उमटविण्यात येतात. सदर नोंद झाल्यानंतर लाभार्थी धान्य घेण्यासाठी पात्र होतो. मात्र अद्याप अंगठा नोंद झाला नाही असे सांगून पुन: पुन्हा बोटे ई-पॉस मशीनवर उमटवून प्रत्यक्षात धान्य परस्पर काढून घेतले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंगठा दिल्यामुळे धान्य दिल्याचा पुरावा तयार होतो.
मांडवड येथील दुकानदार श्रीमती एस.पी. अहेर यांच्या कार्यप्रणालीविरुद्ध अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पुरवठा विभागाकडे माहितीच्या अधिकारात विचारलेल्या शंकेलाही केराची टोपली दाखविण्यात आली
आहे. अहेर यांच्या विरोधात विजय अहेर, जयवंत अहेर, शिवाजी काजळे, सुरेश पिंगळे, पुंडलिक थेटे आदींनी तक्र ार केली आहे.
संपूर्ण तालुक्यात १५६ स्वस्त धान्य दुकानदार असून, ते सर्व आॅनलाइन झाले असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात येतो. त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांत बहुतांश लाभार्थींना धान्य मिळाले नाही म्हणून मांडवड गावात असंतोष पसरला आहे. आॅनलाइन प्रक्रि या सुरू होण्याआधी दुकानदार शिधापत्रिकामध्ये लाभार्थीच्याही न कळत परस्पर नोंद करून काळाबाजारात धान्य विक्र ी करत असत. या गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून शासनाने आॅनलाइनचा धान्यवाटप सुरू केले; पण दुकानदारांनी त्यावरही अनेक युक्त्या शोधून काढल्या आहेत. मात्र तक्र ार करणाऱ्यांची नावेच गायब करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Web Title: The shopkeeper's thumb to ration card holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.