उपनगरला दुकाने सुरूच; घरोघरी पोहोचले फेरीवाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:13+5:302021-04-07T04:15:13+5:30
नाशिक : कोरोना संसर्गामुळे सर्वच दुकाने बंद करण्याचे शासनाचे आदेश असतानाही उपनगर, जेलरोड तसेच जुना सायखेडा मार्गावर अनेक दुकाने ...
नाशिक : कोरोना संसर्गामुळे सर्वच दुकाने बंद करण्याचे शासनाचे आदेश असतानाही उपनगर, जेलरोड तसेच जुना सायखेडा मार्गावर अनेक दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय सकाळपासून अनेक फेरीवाले देखील कॉलनी, सोसायटी परिसरात फिरत होती. बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये होणारी गर्दी आणि त्यातून पसरणारा कोरोना रोखण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वच प्रकारची दुकाने येत्या ३० तारखेपर्यंत बंद राहतील असे आदेश दिले आहेत. असे असतानाही उपनगर, जेलरोड, सायखेडा रोड या मार्गांवरील टेलर्सची दुकाने, पापड, मसाला विक्रेते, पूजा साहित्य, भांड्यांची दुकाने, स्वीटमार्ट, अशी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. आता कोणत्याही प्रकारची दुकाने सुरू राहणार नाही असे स्पष्ट आदेश असतानाही दुकानदारांकडून अनभिज्ञता दाखविली जात आहे. विशेषता: फूड सेक्टरमधील दुकानदार खाद्य दुकाने म्हणून दुकाने उघडून बसली आहेत. चहाची दुकाने, सुपर मार्केट हे भररस्त्यावर सुरू आहेत. याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. काही दुकानदारांनी नाशवंत माल काय करायचा या सबबीवर दुकाने उघडली होती, तर काही टेलर्सनी ग्राहकांचे कपडे दिलेल्या तारखेत शिवून देण्याची जबाबदारी असल्याचे कारण पुढे करून दुकाने सुरूच ठेवली आहेत.
----इन्फो---
इतर दुकाने बंद असल्याचे आदेश असल्याने सकाळपासून कॉलनी, सोसायटी परिसरात फेरीवाल्यांचे आवाज सुरू होते. मातीचे माठ विकणारे, बेडशीट विक्रेते, मिक्सर दुरुस्ती, कांदा विक्री करणारे फेरीवाले परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. निर्बंध नियमात फेरीवाल्यांना मनाई असताना ते फिरत असल्याचे दिसून आले. (फोटो मेल केले आहेत.)