अनलॉक : शहरात उद्यापासून दुकाने खुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:14 PM2020-06-05T21:14:05+5:302020-06-05T21:16:28+5:30

नाशिक - गेल्या अडीच महिन्यांपासून लॉक डाऊनमुळे बंद असलेल्या शहरातील बाजारपेठा शनिवार (दि.६) पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने ...

Shops will be open in the city from tomorrow | अनलॉक : शहरात उद्यापासून दुकाने खुली होणार

अनलॉक : शहरात उद्यापासून दुकाने खुली होणार

Next
ठळक मुद्देदुकानदारांना नियमावली बंधनकारकमॉल, व्यापारी संकुले बंदच


नाशिक - गेल्या अडीच महिन्यांपासून लॉक डाऊनमुळे बंद असलेल्या शहरातील
बाजारपेठा शनिवार (दि.६) पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने सम
आणि विषम तारखांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यात आरोग्य
सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मात्र तत्काळ कारवाई करून
ती बंद करण्यात येतील अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी
दिली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनचा भाग म्हणून गेल्या २४ मार्च पासून लॉक डाऊन
सुरू असून शहरातील बहुतांशी दुकाने बंद आहेत.आता शासनाने मिशन बिगॅन
अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व कामकाज सुरळीत करण्याचे आदेश दिले
असून त्याअंतर्गत शहरातील बाजारपेठा शनिवारपासून (दि.६) खुल्या होणार
आहेत. यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी (दि.
५) महापालिका मुख्यालयात व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि
सर्व प्रकारच्या सूचना केल्या.
शहरातील सर्व बाजारपेठा आणि दुकाने शहर वाहतूक पोलीस शाखेच्या
अधिसूचनेनुसार सम आणि विषम तारखांना खुली राहतील. म्हणजेच रस्त्याच्या
पॅसेज किंवा लेन लगतची दुकाने २, ४, ६, ८,१० अशा तारखंना खुली होतील तर
त्यांच्या समोरील बाजुची दूकाने ३,५,७,९ अशा तारखांना खुली राहतील. सर्व
दुकाने सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत.
कोरोना सर्सग टाळण्यासाठी शसनाच्या आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे
दुकानदारांना आवश्यक आहे. त्यानुसार मास्क, हँडग्लोजचा वापर अनिवार्य
राहील. तसेच दुकाने वेळावेळी निर्जंतुक करावी लागतील. दुकानातील ट्रायल
रूमचा वापर करता येणार नाही तसेच एक्सेंज आणि रिटर्न पॉलीसला परवानगी
असणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यानंतर देखील दुकानात फिजीकल
डिस्टन्सिंग साठी फुट मार्क, टोकन सिस्टीम, होम डिलेव्हरी याबाबत
नागरीकांना प्रोत्साहीत करावे लागणार आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन
केल्यास बाजार किंवा दुकाने त्वरीत बंद करण्यात येणार आहे.
या बैठकीस मनपाचे कर उपआयुक्त प्रदीप चौधरी, महाराष्टÑ चेंबर आॅफ
कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सचिव चंद्रकांत दीक्षीत, धान्य व्यापारी
संघटनेचे प्रफुल्ल संचेती, , रेडीमेड कापड संघटनेचे नरेश पारख, सराफ
असोसिएशनचे चेतन राजापूरकर, स्टेशनरी असोसिएशनचे अतुल पवार, दिपक
कुंभकर्ण, चप्पल शुज व्यापारी संघटनेचे संदीप आहेर, पीठ- गिरणी संघटनेचे
बाळासाहेब मते, दुध मिठाई नमकीन संघटनेचे अध्यक्ष मनोज कोटकर यांच्यासह
अन्य विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो..
ही दुकाने राहणार बंदे
शहरातील मॉल, व्यापारी संकु ले तसेच शासनाने प्रतिबंधीत ठेवलेली केश
कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटीपार्लर, शॉपींग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि
पर्यंटनासंदर्भातील सेवा मात्र बंद ठेवण्यात येणार आहे.
इन्फो...
यांना नियमावलीतून सूट
शहरातील सम- विषम तारखांचा नियम मात्र भाजीपाला, फळे विक्री करणारे,
किराणा, औषध दुकाने, बी- बियाणे विक्रीच्या दुकानांबरोबरच अन्य
जीवनावश्यक वस्तु विक्रीच्या दुकानांना लागु राहणार नाहीत. ज्या
बाजारपेठा आणि बाजारपेठ परीसराचा वाहतूक शाखेच्या अधिसूचनेत समावेश नसेल,
अशा ठिकाणी दुकाने उघडी ठेवण्याबाबत विभागीय अधिकारी स्थानिक
परिस्थतीतीचा विचार करून सम- विषम याच धर्तीवर निर्णय घेतील.
इन्फो..
ग्राहकांना आवाहन
ग्राहकांनी खरेदीसाठी बाहेर जाताना शक्यतो पायी जावे किंवा सायकलचा वापर
करावा, शक्यतो आपल्या घराजवळील बाजारपेठेतच जावे, अन्यावश्यक वस्तुंसाठी
लांब पल्याच्या प्रवासांना परवानी दिली जाणार नाही. खरेदीसाठी मोठ्या
मोटारी सारख्या वाहनांचा वापर करण्यास मनाई असेल.

 

Web Title: Shops will be open in the city from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.