कठोर निर्बंध न हटल्यास शुक्रवारपासून दुकाने खुली करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:43+5:302021-04-07T04:15:43+5:30

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरतर्फे ब्रेक द चेन व व्यापार बंद या विषयावर चर्चा करून ...

Shops will be open from Friday unless strict restrictions are lifted | कठोर निर्बंध न हटल्यास शुक्रवारपासून दुकाने खुली करणार

कठोर निर्बंध न हटल्यास शुक्रवारपासून दुकाने खुली करणार

Next

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरतर्फे ब्रेक द चेन व व्यापार बंद या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेनचे धोरण प्रत्यक्षात व्यापाराला आळा घालणारे आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांच्या विरोधात असा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे, असे स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, शुभांगी तिरोडकर, अनिलकुमार लोढा, अमरावतीचे विनोद कलंत्री, कोल्हापूरचे अध्यक्ष संजय शेटे, सोलापूरचे राजू राठी, कमलेश धूत , पोपटलाल ओस्तवाल, दीपेंन अग्रवाल, कॅटचे राज्य चेअरमन राजेंद्र बांठिया, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेदांडिया यांच्यास अन्य व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणाला विरोध केला. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले.

Web Title: Shops will be open from Friday unless strict restrictions are lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.