जिल्हा रुग्णालयाच्या अर्भक विभागात शॉर्टसर्किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:22 AM2021-11-23T00:22:50+5:302021-11-23T00:24:35+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यात सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही.
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यात सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही.
जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.२२) झालेल्या शॉर्टसर्किटच्या प्रकारामुळे तातडीने पावले उचलत प्रशासनाने सर्व अर्भकांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित केले. तसेच विजेच्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून तत्काळ वायर बदलण्यासह अन्य उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात अचानकपणे घडून आलेल्या या शॉर्टसर्किट प्रकारामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात भंडारा तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना यांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित झाली आहे.