पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:07 AM2017-07-24T00:07:48+5:302017-07-24T00:08:00+5:30

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि. २३) एका उमेदवाराने चार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज दाखल केले

Short-response on the first day | पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि. २३) एका उमेदवाराने चार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज दाखल केले असून, संचालकपदासाठी दोन व सेवक गटातून एक अर्ज दाखल झाला आहे; मात्र अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी अमावास्या आल्याने विविध पदांसह संचालक मंडळासाठीही अर्ज दाखल करण्याचा ओघ अत्यल्प असल्याचे दिसून आले.  अर्ज स्वीकृतीच्या पहिल्या दिवशी संस्थेचे उपसभापतिपद भूषविलेले विजय तुकाराम पवार यांनी अध्यक्ष, सभापती, सरचिटणीस, चिटणीस या कार्यकारी मंडळाच्या चार पदांसाठी अर्ज दाखल केला. तर संचालकपदासाठी नांदगाव बाजार समितीचे सभापती तेज कवडे, सटाणा येथील मधुकर सुभाष कापडणीस या दोघांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सेवक गटातून रामनाथ शेळके यांचा एकमेव अर्ज आला आहे. मविप्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी दिवसभरात ६३ उमेदवारांनी अर्ज घेतले. यात नांदगावचे विद्यमान संचालक दिलीप पाटील, माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी संचालक गंगाधर शिंदे, मधुकर कवडे, डॉ. प्रशांत देवरे, बाळासाहेब कांडेकर, साहेबराव पाटील, बाळासाहेब कोल्हे, किरण मोगल, माधवराव कोकाटे, प्रभाकर पगार, नितीन मोगल, अविनाश कापडणीस आदींचा समावेश आहे.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत २१ जणांचे कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी १३ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्र वारपासून (दि. २१) अर्ज विक्र ीस प्रारंभ झाला असून, तीन दिवसांत एकूण ३१९ उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली आहे. अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी अमावास्या आल्याने अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी करणे व अर्ज दाखल करणे टाळले. त्यामुळे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी शांतता दिसून आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने येत्या दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक अर्ज भरताना एका उमेदवारास तीन निवडणूक चिन्हे नोंदविण्याची संधी मिळणार असून, त्यातील एका चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा अधिकार राहील. पॅनल निर्मितीनंतर जे पॅनल सर्वात प्रथम चिन्हाची मागणी करेल, त्यांना आपल्या आवडीचे चिन्ह मिळणार असल्याचे निवडणूक मंडळाने स्पष्ट केले आहे.
राजकीय घडामोडींना वेग
पॅनल निर्मितीपूर्वी राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण मिळत असून, निफाड तालुक्यातील उमेदवारांवर दोन्ही पॅनलकडून विशेष विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. गेल्या वेळी सोनवणे-ठाकरे यांच्या पॅनलकडून निवडणूक लढविणारे माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यंदा सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या गटात सामील झाल्याने माजी अध्यक्ष अरविंद कारे यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारे सोनवणे-ठाकरे पॅनलकडून चाचपणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळाच व्यक्त केली जात आहे. या पॅनलसाठीही त्यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
समीकरणासाठी रणनीती
मविप्र निवडणुकीत विजयासाटी दोन्ही पॅलकडून आकड्यांचे समीकरण जुळविण्यासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक मतदार असल्याने येथील जनाधार निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे येथे संचालक पदासह पदाधिकारी जागेसाठी तुल्यबळ उमेदवार देणे दोन्ही पॅनलसाठी अपरिहार्य बनले आहे. तर दुसऱ्या क्र मांकावर मतदार असलेल्या सटाणा तालुक्यात पदाधिकारी जागेसाठी उमेदवार देऊन मतांचा समतोल साधण्याचा दोन्ही पॅनलचा प्रयत्न असणार आहे.

Web Title: Short-response on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.