राज्यात आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 09:06 PM2020-08-09T21:06:24+5:302020-08-10T00:31:00+5:30
नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचे अद्याप ३० टक्के प्रवेशही निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे आॅगस्टअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया कशी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्'ासह संपूर्ण राज्यभरातून या प्रवेशप्रक्रि येला अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचे अद्याप ३० टक्के प्रवेशही निश्चित होऊ शकलेले नाही. त्यामुळे आॅगस्टअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया कशी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीईअंतर्गत नाशिक जिल्'ात रविवारी (दि.९) सायंकाळपर्यंत सुमारे २४४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ६८१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे, तर राज्यभरात आतापर्यंत केवळ २८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ४७ हजार २० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. आता लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परंतु, इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन या संघटनेने गेल्या पंधरवड्यापासून आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रतिकूल भूमिका घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. अशा विद्यार्थ्यांना लॉटरीत निवड होऊन प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटईटी प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
प्रवेशांची स्थिती नाशिक राज्य शाळा - ४४७ ९,३३१ राखीव जागा- ५,५५७ १,१५,४४९ आॅनलाइन अर्ज- १७,६३० २,९१,३६३ लॉटरीत निवड- ५,३०७ १,००,९२६ प्राथमिक प्रवेश- २,६८१ ४७,०२० प्रवेश निश्चित- २,४४६ २८,००५
इंग्रजी शाळांना आरटीईचा टक्का वाढण्याची भिती
कोरोनामुळे सर्वसाधारण गटातील मुलांचे प्रवेश होऊ शकलेले नसताना आटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवेशांच्या तुलनेत शिक्षण हक्क कायद्यांतगत दिले जाणारे प्रवेश २५ टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची भीती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून प्रवेशप्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेश संथगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली असली तरी कागदपत्रांची पडताळणी होऊ न शकल्याने त्यांच्या पाल्याचे प्रवेश निश्चित होऊ शकलेली नाही.