सिन्नर तालुक्यात उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:14 PM2020-10-03T23:14:35+5:302020-10-04T01:15:30+5:30
निर्हाळे : यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेल्याने आता शेतकरी उन्हाळ् कांदा बियाणांच्या शोधात असून अवघ्या महिनाभरात उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो मागे दोन ते तीन हजार रु पये वाढ झाली असून उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो किंमत 3200 ते 5000 इतके भाव वाढ झाली आहे.

या वर्षी करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना सततच्या पावसामुळे शेतकर्यांनी लाल कांद्याचे ठाकलेले बियाणे उतरलेच नाही. तर जे बियाणे उतरले ते अतिपावसामुळे वाया गेले. पोळ कांदा रोपांची तिच अवस्था झाली.महागडे बियाणे खरेदी करून ते वाया गेल्याने शेतकरी आता उन्हाळ कांदा लागवडीसाठी विचार करत असून घरगुती बियाणांचा शोध घेतला जात आहे.उन्हाळ कांदा बियाणे 2000 ते 2500 भावाने मिळत होते मात्र हेच बियाणे आता 3000 ते 5000 हजार रु पये झाले आहे.अद्यापही तालुक्यांत पावसाची हजेरी सुरूच असल्याने लाल कांद्याप्रमानेच उन्हाळ् कांदा बियाणे वाया जाऊ नये यासाठी शेतकरी उशिरा कांदा बियाणे टाकण्याची शक्यता आहे. साहाजिकच कांदा रोपे तयार होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबर महिन्यात उन्हाळ् कांदा लागवडीसाठी प्रारंभ होऊन हा कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढणीस येईल. मात्र या महिन्यात थंडी आणि पडणारे बादड व धुक्याने तो वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. तालुक्यात शेतकरी वर्गानी या वर्षी उन्हाळ कांदा पिकाकडे वळण्याची शक्यता असून उन्हाळ कांदा पिकाचे विक्र मी उत्पादन होण्याची शक्यता आहे.आज मिळणारा बाजार भाव राहिलच याची खात्री नाही.