निफाड तालुक्यात लशींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:45 PM2021-03-18T20:45:48+5:302021-03-19T01:20:54+5:30

विंचूर : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यात प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असले तरी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Shortage of vaccines in Niphad taluka | निफाड तालुक्यात लशींचा तुटवडा

निफाड तालुक्यात लशींचा तुटवडा

googlenewsNext
ठळक मुद्देदोनच ठिकाणी लसीकरण होणार

विंचूर : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यात प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असले तरी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवारी (दि.१९) तालुक्यात फक्त निफाड व म्हाळसाकोरे येथेच लसीकरण होणार असून अन्य ठिकाणी लसीकरण होणार नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. लस शिल्लक नसल्याने दोनच ठिकाणी लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या बघता तालुक्यात लसीकरण मोहीम वेगाने होण्याची गरज असून जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Shortage of vaccines in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.