जिल्ह्यात कांदा बियाण्याचा तुटवडा; दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:52 PM2020-06-05T17:52:34+5:302020-06-05T18:19:43+5:30
नाशिक : गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, तर कधी बंद राहिल्याने कांदा भावावर त्याचा परिणाम झाला. सध्या कांद्याला मिळणाºया भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात कांद्याला भाव येण्याच्या अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावर्षी कांदा बियाण्याचा तुटवडा जाणवत असून, बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
नाशिक: गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, तर कधी बंद राहिल्याने कांदा भावावर त्याचा परिणाम झाला. सध्या कांद्याला मिळणाºया भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात कांद्याला भाव येण्याच्या अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावर्षी कांदा बियाण्याचा तुटवडा जाणवत असून, बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
मागीलवर्षी कांद्याला उच्चांकी दर मिळाला होता. अगदी १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर गेल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या चेह-यावर हसू फुलले होते. गतवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवड झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकºयांनी दुबार लागवड करूनही उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. यामुळे शेतक-यांना घरचे बियाणे तयार करता आले नाही. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउनमुळे अनेक देशांमध्ये होणारी निर्यात बंद झाल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. सध्या उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त ९४१, तर सरासरी ७०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.