शॉर्टसर्किटने डाळींब बागेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:12 PM2018-03-28T15:12:02+5:302018-03-28T15:12:02+5:30
उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचे सुमारे पंचवीस टन डाळींबाचे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा यावर्षीही शार्टिसर्कटमुळे डाळींब बाग जळाल्याने सदर शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरता हतबल झाला आहे. खारिपाडा (महात्माफुलेनगर) शिवारात डोंगरगाव येथील शेतकरी रमेश सावंत यांनी साडेतीन हजार डाळींब आण िसुमारे एक हजार आवळा झाडांची फळबाग फुलविली आहे. शेतालगत असलेल्या वन्या ओहळच्या आजुबाजुला काटेरी झुडुपे आहेत. झुडुपांवरु न वीजेच्या तारा गेलेल्या आहेत. वीजेच्या तारांना झोल पडल्यामुळे वारा व पक्षांच्या हालचालीने शॉर्टसर्किट होऊन डाळींबाची साठ - सत्तर झाडे आगीने होरपळून गेली आहे. प्रसंगावधानाने शेजारील शेतकरी बांधवांनी आग विझवुन बाकीची बाग वाचवली आहे.
डोंगरगाव भागातील विद्युतवाहक तारा लोंबकळतांना दिसतात.विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुमारे छत्तीस लाखाचे नुकसान झाले परंतु विजवितरण कंपनीने केलेल्या चुकीच्या पंचनामामुळे या शेतकर्याला अद्यापही एक दमडीची नुकसान भरपाई मिळाली नाही. घटनास्थळी भेट न देता संबंधित लखमापुर, सटाणा विजवितरण कार्यालयाने परस्पर व चुकीचा पंचनामा करु न नुकसान भरपाईपासुन वंचित ठेवल्याचा आरोप शेतकरी सावंत यांनी केला आहे.