सिन्नर तालुक्यात बंदला प्रतिसाद

By admin | Published: June 6, 2017 01:51 AM2017-06-06T01:51:53+5:302017-06-06T01:52:05+5:30

सिन्नर : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदमध्ये शहर व तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली.

Shot response in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात बंदला प्रतिसाद

सिन्नर तालुक्यात बंदला प्रतिसाद

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदमध्ये शहर व तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून आला. गावोगावी शेतकऱ्यांनी बैठका घेऊन कर्जमाफी व शेतमालाच्या हमीभावाची मागणी केली. व्यापाऱ्यांनीही शेतकरी संपात स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. अनेक गावांमध्ये रस्त्यावर कांदे व दूध ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तालुक्यातील पांगरी व नायगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, तर पाथरे, वडांगळी व बारागावपिंप्री येथे शेतकऱ्यांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविला.

Web Title: Shot response in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.