सामाजिक भान असावे : सदानंद देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:59 PM2019-10-27T23:59:41+5:302019-10-28T00:05:55+5:30
अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले.
नाशिक : अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले.
प. सा. सभागृहात कादवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आल्यानंतर देशमुख बोलत होते. देशमुख यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारार्थींमध्ये प्रवीण जाधव (राजकीय), डॉ. भाऊसाहेब मोरे (सामाजिक), डॉ. धर्मा कोटकर (उद्योग), हिरामण शिंदे (कृषी), प्रशांत भरवीरकर (पत्रकारिता), शरद उगले (सांस्कृतिक), मनीषा सावंत (प्रशासन), पुंजाजी मालुंजकर (साहित्य), गोरक्षनाथ गायकवाड (सहकार), दत्तात्रय अलगट (शैक्षणिक) यांचा समावेश होता त्यांना कादवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात
आले. कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने, गीतकार बाबासाहेब सौदागर, कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, प्रा. डॉ. यशवंतराव पाटील, विठ्ठलराव संधान, प्रवीण नाना जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक विजय मिठे यांनी केले.