हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करावी : शमशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:14 AM2018-11-16T01:14:03+5:302018-11-16T01:14:36+5:30
मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात शमशी बोलत होते.
मालेगाव : मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात शमशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना इद्रीस अकील मिल्ली हे होते.
शमशी पुढे म्हणाले की, हुंडा ही अनिष्ट प्रथा रूढ झाली आहे. या प्रथेमुळे स्त्रियांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागते. ही प्रथा बंद करण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. हुंडा बळीमुळे समाजात वेगळा संदेश जातो. इस्लाम धर्मामध्ये हुंडा घेणे व देणे याला मनाई आहे. तरी देखील हुंडा घेतला जातो. समाजातील काही घटकांमुळे समाजाचे नुकसान होत आहे. स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे शमशी यांनी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात जैनब मदशातील अनाथ मुलीचा विवाह एक रुपया हुंडा न घेता पार पडला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.