मावळत्या मनपा प्रशासकांकडून जाता जाता खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:29 AM2022-03-26T01:29:25+5:302022-03-26T01:29:49+5:30
महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले आहेत.
नाशिक - महापालिकेचे मावळते प्रशासक कैलास जाधव यांची बदली त्यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार बी.जी सोनकांबळे यांच्याकडून काढून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर उद्यान उप आयुक्तांना देखील ३१ मार्चपर्यंत कार्यमुक्ततेचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविष्ट अष्टीकर यांची अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी शासनाने कोणत्याही अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती केलेली नाही. सहाजिकच या रिक्तपदाचा कार्यभार मुख्य लेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला हाेता. मध्यंतरी या पदावर शासनाने मंत्रालयातील आरोग्य विभागाचे सचिव अशोक अत्राम यांची नियुक्ती केल्याची चर्चा होती. मात्र, ते महापालिकेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोनकांबळे यांच्याकडे कायम होता. मात्र, त्यांच्या विनंतीवरून कैलास जाधव यांनी जाता जाता त्यांच्यावरील कार्यभार हलका करून उपआयुक्त करूणा डहाळे यांच्याकडे सेापवला आहे. दुसरीकडे नाशिक महापालिकेचे उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांनाही ३१ मार्च नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत. आमले यांची कृषी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्यपदी बदली झाली आहे. मध्यंतरी त्या पदावर रूजू होण्यासाठी प्रयत्न करणारे आमले हे नंतर महापालिका आणि कृषी प्रशिक्षण केंद्रांचा कार्यभार बघत असले तरी त्यांच्या विनंतीवरून त्यांनाही ३१ मार्च नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत.