मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:17 PM2018-08-02T23:17:53+5:302018-08-02T23:18:32+5:30

जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी करावे, असा ठराव मराठा समाज संघटनांनी मंजूर केला आहे.

On the shoulders of Sunil Bagul, the responsibility of the Maratha community | मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर

मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर

googlenewsNext

नाशिक: जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी करावे, असा ठराव मराठा समाज संघटनांनी मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांचे स्थानिक हस्तक करीत असल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे या संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मराठा क्रांती मूक मोर्चा शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे.९ ऑगस्ट क्रांती मोर्चाची वर्षपूर्ती साजरी होत असताना मूक मोर्चाने ठोक मोर्चाची भूमिका जाहीर केल्यानंतर शांत असलेला मराठा समाज आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर येऊ लागला. याचा राजकीय फायदा उठविण्याच्या कूट हेतूने काल परवापर्यंत मराठा समाजाने जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या काही राजकीय नेत्यांनी आपले हस्तक घुसवून आंदोलनाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडवून आणत मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या या प्रयत्नांना नाशिकमधील क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शह देत शांततेला गालबोट लावू न देता आपले आंदोलन सुरू ठेवले. नाशिक शांत आहे म्हणून अस्वस्थ असलेल्या या राजकीय नेत्यांनी आपल्या हस्तकांकरवी प्रति क्रांती मोर्चा उभा करून आजपर्यंतच्या या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे कटकारस्थान उधळून जिल्ह्यातील समाज एकसंघ राहावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने गेली दहा ते पंधरा वर्ष आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध संघर्ष करणा-या मराठा संघटनांनी या चळवळीचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांना सोपविण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

Web Title: On the shoulders of Sunil Bagul, the responsibility of the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.