गैरहजर भाजपा कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:52 AM2019-07-16T00:52:55+5:302019-07-16T00:53:31+5:30

भाजपाने पक्षात येणाऱ्या अनेकांना पदांची खैरात वाटली खरी, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या महत्त्वाच्या बैठकीस अनेक पदाधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याने पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे या नाराज झाल्या. दांडी बहाद्दरांना काम करायचे नसेल तर पदमुक्त करा, असा आदेशच त्यांनी दिला.

 Show cause notices to non-functioning BJP workers | गैरहजर भाजपा कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटिसा

गैरहजर भाजपा कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटिसा

Next

नाशिक : भाजपाने पक्षात येणाऱ्या अनेकांना पदांची खैरात वाटली खरी, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या महत्त्वाच्या बैठकीस अनेक पदाधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याने पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे या नाराज झाल्या. दांडी बहाद्दरांना काम करायचे नसेल तर पदमुक्त करा, असा आदेशच त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१५) सरोज पांडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. शहर जिल्हा पदाधिकाºयांच्या आढावा बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. भाजपात अनेक आगंतुकांना पदे देण्यात आली असून, ही खैरात वाटताना त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरी किंवा त्यांची कर्तव्य भावना तपासलेली नाही. प्रत्येक जणदेखील आपल्या सोयीनेच बैठकीला हजर असतो. यावेळी व्यासपीठावर विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सदस्यता नोंदणी मोहिमेचे उत्तर महाराष्ट्र संयोजक शशिकांत वाणी, पवन भगूरकर, संभाजी मोरु स्कर, उत्तम उगले, प्रदीप पेशकार आदी होते.
बाजू सावरण्याचा प्रयत्न
सोमवारी पक्षाच्या महाराष्टÑ प्रभारी येणार असताना अनेक उपाध्यक्ष चिटणीस आणि अन्य पदाधिकारी गैर हजर होते. पांडे यांनी आढावा घेत असताना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सांगितले आणि त्यांची गैरहजेरीची कारणे समाधानकारक नसेल तर त्यांना पदमुक्त करण्याचे आदेशच दिले आहेत. शहराध्यक्ष आमदार सानप यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

Web Title:  Show cause notices to non-functioning BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.