आरक्षणाच्या लढाईत एकजूट दाखवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:13 PM2018-10-20T23:13:12+5:302018-10-21T00:08:31+5:30
देश व इतर राज्यांमध्ये परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलती दिल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र अन्याय केला जात आहे. भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी अद्याप निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन संत गाडगेबाबा परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष विजय देसाई यांनी केले.
सिन्नर : देश व इतर राज्यांमध्ये परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलती दिल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र अन्याय केला जात आहे. भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी अद्याप निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन संत गाडगेबाबा परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष विजय देसाई यांनी केले.
आरक्षण जागृती व समाजाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी परीट धोबी समाजाच्या संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या निर्देशनाखाली प्रत्येक जिल्ह्यात विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील समाजबांधवांची बैठक परीट गल्लीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी, संत गाडगेबाबा धर्मशाळा, त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त लहानू राऊत, चाचा चौधरी, सेवानिवृत्त तुरुंग अधिकारी शांताराम निकम, तालुकाध्यक्ष विजय आंबेकर, सुधाकर वाडेकर यावेळी उपस्थित होते.
आरक्षणासह समाजातील युवकांसमोरील व्यावसायिक समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लॉण्ड्री व्यवसायाला लघुउद्योग म्हणून सवलती मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. बाजीराव आंबेकर, अशोक देसाई, गोरख रंधे, सचिन सगर, विजय निकम, गोरख वाडेकर, योगेश जाधव, दत्तात्रय जाधव, प्रमोद आंबेकर, धीरज जाधव, भाऊसाहेब बोºहाडे, ज्ञानेश्वर जाधव, किसन वाडेकर, निवृत्ती सगर, बाळासाहेब राऊत आदींसह तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.