‘लोकमत’ वर स्नेह शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:28 PM2019-07-25T22:28:42+5:302019-07-25T22:32:09+5:30

सिन्नर : मंगलमय वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Showers of affection on 'Lokmat' | ‘लोकमत’ वर स्नेह शुभेच्छांचा वर्षाव

सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यास ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांना शुभेच्छा देतांना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे. समवेत नगरसेवक निरुपमा शिंदे, सुजाता भगत, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, रामनाथ पावसे, दीपक बर्के, जगन्नाथ पवार, अमोल भगत, गोपाळ शेळके आदि.

Next
ठळक मुद्दे‘स्मार्ट सिटी स्मार्ट सिटिझन’: सिन्नर विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात

सिन्नर : मंगलमय वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित ‘पानसुपारी’ समारंभास शेकडो सिन्नरकर सहर्ष उपस्थित राहिले. ‘लोकमत’वरील आपला स्नेह प्रकट करीत शब्दसुमनांनी अलकृंत झालेल्या भावनांचा वर्षाव करताना ‘लोकमत’शी असलेले स्नेहबंध अधिक गहिरे करण्याचे अभिवचनही सिन्नरकरांनी दिले.
वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ ने प्रकाशित केलेल्या ‘स्मार्ट सिटी स्मार्ट सिटिझन’ या विशेषांकाचे यावेळी सर्वांनी मन:पूर्वक कौतूक केले. 
या समारंभास ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, सुदामशेठ सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, संचालक अनिल सांगळे, सचिव विजय विखे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी. एन. नाकोड, राम हरदास गुरुजी, उद्योजक विवेक चांडक, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युनूस शेख, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, वावी पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक विकास काळे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, डॉ. विष्णू अत्रे, डॉ. विजय लोहारकर, सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, पद्माकर गुजराथी, स्टाईसचे अध्यक्ष पंडीत लोंढे, नामकर्ण आवारे, बाबासाहेब दळवी, अविनाश तांबे, रामदास दराडे, सुनील कुंदे, नगरसेवक पंकज मोरे, नगरसेवक सोमनाथ पावसे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, विजय जाधव, शीतल कानडी, मल्लू पाबळे, सुजाता भगत, निरुपमा शिंदे, युवक कॉँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिनेश चोथवे, मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, मुख्याध्याक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, दीपक बर्के, आनंदराव शेळके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे, कस्तुरी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास क्षत्रिय, उद्योजक किशोर राठी, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. भूषण वाघ, डॉ. जी. एल. पवार, डॉ. आर. आर. बोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष चैतन्य कासार, वैभव मुत्रक, लायन्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, खरेदी विक्रीस संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊसाहेब तांबे, उपाध्यक्ष नीशा वारुंगसे, गोदा युनियन कृषक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव सांगळे, सिन्नर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, सुनील तोमर, बॅँक आॅफ महाराष्टÑचे शाखा व्यवस्थापक विशाल वाघ, टीजीएसबी बॅँकेचे विवेक बकरे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, युवक राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शिक्षक नेते अंबादास वाजे, मोहचे सरपंच सुदाम बोडके, पाडळीचे सुभाष जाधव, सुभाष जाजू यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, बँकींग, शिक्षण आदि क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपल्या सदिच्छा दिल्या.
‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी विभागीय कार्यालयात सौ. सविता व सचिन सांगळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. ‘लोकमत’चे सिन्नर तालुका प्रतिनिधी शैलेश कर्पे, सचिन सांगळे, कृष्णा वावधाने, योगेश ठुबे, गणेश पगार यांच्यासह लोकमत परिवाराने आभार मानले.

Web Title: Showers of affection on 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत