नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर श्रमदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 06:49 PM2019-09-30T18:49:23+5:302019-09-30T18:53:56+5:30

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.

Shraddan campaign on the seven-storied fort for Navratri festival | नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर श्रमदान मोहीम

सप्तश्रृंगी गड येथे ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत परिसराची स्वच्छता करताना ईशाधिन शेळकंदे व अन्य अधिकारी.

Next
ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांनी श्रमदान

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.
प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागल्याने पर्यावरण रक्षण व जनजागृती करण्यासाठी शासनाच्या निर्णयाला साथ सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा ठरावच ग्रामसभेत संमत करण्यात आला असून प्लास्टिक आढळल्यास अथवा वापरल्यास ५०० ते ५००० रु पये दंड आकारण्यात येत आहे.
एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी बाबत संपूर्ण पाहणी केली. यावेळी पहिल्या पायरी लगतच आडोशाला ग्रामपंचायतीच्या एका भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसल्याने त्यांनी स्वत: साफसफाई करण्यास सुरु वात केली.
यावेळी उपस्थित कळवणचे तहसीलदार बी. एन. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम व सुरगाणा तहसीलदार सूर्यवंशी यांनी श्रमदानास सुरु वात केली. सलग दोन तास श्रमदान करीत सरपंच, सदस्य, कळवण पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामस्थ व कर्मचारी आदींनी जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा गोळा करीत श्रमदान केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, तलाव स्वच्छता व परिसर स्वच्छता याबबत प्रत्येक्ष भेट देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रोत्सवानिमित्त श्रमदान मोहीम राबविण्यात आली. गडावर प्लास्टिक बंदीसाठी प्रशासन तत्पर असून दुकानदार, भाविक व ग्रामस्थ यांनी शंभर टक्के प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे
- ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.
 

Web Title: Shraddan campaign on the seven-storied fort for Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.