श्रद्धा कराळेने वारली रांगोळी काढत नोंदवला विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:55 AM2018-08-07T11:55:49+5:302018-08-07T11:56:03+5:30
दोन हजार वर्ग फुट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार
नाशिक-आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहोचावी या उद्देशाने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फुट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार केले आहेत.एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथे आदिवासी विकास विभागाच्या सहाकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. याबद्दल खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रद्धा हिचा पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रविवारी दुपारी २ ते ८ या वेळेत श्रद्धाने वारली रांगोळी रेखाटली. त्यात आदिवासी उत्सव, नृत्य, झोपडी, शेती, तारपा वाद्य, पशु-पक्षी आदि आदिवासींची संपुर्णा दिनचर्या रांगोळीमार्फत रेखाटली आहे. वंडर बुक रेकॉर्ड वर्ल्ड, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार आॅफ रेकॉर्ड, भारत बुक आॅफ रेकॉर्ड मॉरिशस, डायमंड बुक आॅफ रेकॉर्ड आॅस्ट्रेलिया आदि रेकॉर्ड टायटल या रांगोळीने मिळविले आहेत. खासदार चव्हाण म्हणाले, संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे. रांगोळीद्वारे आदिवासी कला जगभर पोहोचविण्याचा हा प्रयत्न अभिमानास्पद आहे. हे काम वाखाणण्याजोगी, यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अमन मित्तल, प्राचार्य सुरेश देवरे, कविता बोंडे आदि उपस्थित होते.