उंटवाडीत श्री म्होसाबा महाराज यात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:28 AM2019-05-12T00:28:38+5:302019-05-12T00:28:55+5:30

उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त म्हसोबा मंदिरात पहाटे म्हसोबा महाराज देवस्थानचे सचिव सदाशिव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक, महापूजा आणि महाआरती करण्यात आली.

 Shree Mhosa Baba Maharaj Yatra started in Utdwadi | उंटवाडीत श्री म्होसाबा महाराज यात्रेला प्रारंभ

उंटवाडीत श्री म्होसाबा महाराज यात्रेला प्रारंभ

googlenewsNext

नाशिक : उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त म्हसोबा मंदिरात पहाटे म्हसोबा महाराज देवस्थानचे सचिव सदाशिव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक, महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
सिडको परिसरालगत असलेल्या सिटी सेंटर मॉलजवळील उंटवाडीतील अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रेला आज प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत रहाटपाळणे, विविध खेळण्यांची दुकाने त्याचप्रमाणे हार-फुले, प्रसादाची दुकाने थाटली आहेत.
म्हसोबा यात्रेनिमित्त मोतीवाला कॉलेजच्या वतीने सर्वरोगनिदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यावेळी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी या शिबिरात सहभाग घेतला. तसेच सायंकाळी आर्केस्ट्रा म्युझिक मेलडीचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी (दि.१२) दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यावेळी महाराष्ट्रासह परप्रांतातूनही कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. या कुस्त्यांच्या फडात महिला कुस्तीपटूदेखील सहभागी होणार आहेत.

Web Title:  Shree Mhosa Baba Maharaj Yatra started in Utdwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.