श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे महिलांचा गौरव नामपूर : प्रभातफेरीसह बेटी बचावचा संदेश देणाºया नाटिकेने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:07 AM2018-03-09T00:07:50+5:302018-03-09T00:07:50+5:30
सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.
सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी महिलांच्या सन्मानाचे उत्सवी उपचाराचे सोहळे साजरे न करता एकूणच स्त्रीचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मान जपण्याचे व तो अधिकाधिक वृद्धिंगत कसा होईल याची काळजी समाजाने वाहण्याची गरज प्रतिपादीत केली. कृष्णाई मंगल कार्यालयात अग्रवाल, बागलाण पंचायत समितीच्या उपसभापती शीतल कोर, कृषिरत्न पुरस्कारप्राप्त निलेश चव्हाण व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्नेहलता नेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी बोलताना अग्रवाल यांनी महाराष्टÑ ही राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या धुरिणींची भूमी आहे. त्यांचा समर्थ वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्टÑातील महिलावर्गाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून समाजातील वाढत्या भ्रूणहत्या व नकोशी मुलींच्या वाढत्या प्रमाणाबद्दलही अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखी मंचच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्र माचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत नामपूरच्या होम मिनिस्टरचा मान यामिनी सावंत यांनी पटकावला. त्यांना अग्रवाल यांच्या हस्ते पैठणी साडीची भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्रीहरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद नेरकर,पूनम कोकणे , पूनम सोनवणे , नामपूरच्या उपसरपंच मंगला सावंत , संतोष सावंत, पांडुरंग सावळा, प्रकाश अहिरे , पूनम खरोटे ,सुनिता पाटील, समीना बोहरी, मयुरी शिरापुरे , सीमा बधान ,आशादेवी वाघ, पुष्पा मुथा, सोनाली निकम ,दिपाली चव्हाण ,मालती अग्नीहोत्री ,करुणा अलई ,प्रियंका अलई, योगिता सोनवणे यांच्यासह हजार ते अकराशे महिला उपस्थित होत्या.
तेरा महिलांचा झाला सन्मान...
सुनिता पाटील (स्मशानभूमी सेविका नाशिक), पूनम राऊत (पोलीस निरीक्षक दामिनी पथक), पार्वताबाई शंकर येवले (जीवन गौरव पुरस्कार नाशिक),अलींनी दीदी ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ; चंद्रभागा धोंडीराम भोई (कृतीशील सरपंच, तळेगाव दिंडोरी), प्रियंका अभिजित बागड (अध्यक्ष रोटरी क्लब सटाणा), मनीषा राहुल खरे (अंगणवाडी सेविका, खमताणे), सुनंदा बाजीराव भामरे (माध्यमिक शिक्षिका, नामपूर), अलका किसनसिंग परदेशी (सेवाभावी अध्यापिका,नाशिक), लता बळीराम महाले (सेवाभावी मुख्याध्यापिका, नामपूर) कविता बळवंत सावंत (सरपंच ,नामपूर), इंदुबाई चिला अहिरे (कृतीशील कृषीकन्या टेंभे) मंगल भिका शिरोळे (लिपिक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, नामपूर)
भावस्पर्शी नाटक
ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या महिलांनी ‘स्रीभ्रुण हत्या’ या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला उपस्थिांनी भरभरून दाद दिली. याप्रसंगी तळेगाव विद्यालयाच्या बाल सावित्री पायल चौधरी ,वैष्णवी चौधरी, धनश्री ढाकणे या विद्यार्थीनींनी ‘महिला अबला की सबला?’ या विषयावर व्यक्त केलेल्या मनोगताला उत्स्फूर्त दाद मिळाली.