श्रीपाद वल्लभांनी अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत दिलेला ज्ञानाचा ठेवा अमूल्य निटुरकर : संस्कृतभाषा सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:50 AM2018-02-04T00:50:20+5:302018-02-04T00:50:51+5:30
नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे.
नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे. तो सखोलतेने जाणून घ्यावा, असे प्रतिपादन भाऊ महाराज निटुरकर यांनी केले.
संस्कृत भाषा सभा व सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शनिवारी (दि.३) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कै. डॉ. वि. म. गोगटे स्मृतिदिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, श्रीपाद वल्लभ हा कलियुगातला महत्त्वाचा अवतार होता. त्यांनी आपल्या जीवनात खूप कार्य केले होते. जीवनाचा अर्थ त्यांनी सोप्या शब्दात सांगितला. त्यांच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मंगल आचरण फार महत्त्वाचे आहे. मंगलाचे स्मरणही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व ज्ञान संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकली पाहिजे. संस्कृत भाषेत मोठा गोडवा आहे. ही भाषा शिकणाºया प्रत्येकाला त्याची अनुभूती येते.
याप्रसंगी संस्कृत भाषा सभेचे रमेश देशमुख, प्रा. विलास औरंगाबादकर, अॅड. अभिजित बगदे, डॉ. विकास गोगटे, विवेक गोगटे, डॉ. देवदत्त देशमुख, पद्माकर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. मीनल पत्की यांनी सूत्रसंचालन केले. वेद काळातील उपासनेबाबत ते म्हणाले की, वेद काळात सगुण उपासना नव्हती. त्याकाळात निर्गुण उपासना व्हायची. वेद काळात प्रतिमा, मंदिरे नव्हती. उपासनेला सोपे पडावे म्हणून नंतरच्या काळात या गोष्टी अस्तित्वात आल्या. मंगलतेने परमेश्वराची आराधना करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.