डुबेरे जनता विद्यालयात श्रींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:55 PM2018-09-20T17:55:40+5:302018-09-20T18:03:53+5:30

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयात गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.

 Shree's environmental clear immersion in Dubere Janata Vidyalaya | डुबेरे जनता विद्यालयात श्रींचे पर्यावरणपूरक विसर्जन

डुबेरे जनता विद्यालयात श्रींचे पर्यावरणपूरक विसर्जन

googlenewsNext

विद्यालयात शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. मुख्याध्यापक एस. बी. येवले यांनी प्रास्तविक केले. जलप्रदूषण टाळा, प्लॅस्टिक आॅफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्तींना असलेला सासायनिक रंग लावलेला असतो तो सहसा पाण्यात विरघळत नाही. गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यात रासायनिक घटकांचा तवंग पसरतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन टाळावे असे मुख्याध्यापक येवले यांनी सांगितले. यावेळी १ हजार विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती सार्वजनिक पाण्यात विसर्जित न करण्याची शपथ घेतली. यावेळी एस. एस. पगार, एस. व्ही. शिंदे, एन. पी. माळी, पी. एम. कांबळे आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. इ. ए. खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. डी. एस. पाचोरे यांनी आभार मानले.

Web Title:  Shree's environmental clear immersion in Dubere Janata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.