श्रीराम विद्यालयात १५० मुलींच्या लेझिम पथकाने नृत्यासह केले श्रींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:11 PM2018-09-21T13:11:49+5:302018-09-21T13:12:07+5:30
१५० मुलींच्या लेझिम पथकाने हलगी व संबलच्या तालावर सुंदर नृत्य करत या मिरवणूकीत सहभाग घेतला
नाशिक- येथील तरु ण ऐक्य मंडल पंचवटी या स्वातंत्र्यपूर्र्व काळात स्थापन झालेल्या मंडळाच्या गणेशाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. १५० मुलींच्या लेझिम पथकाने हलगी व संबलच्या तालावर सुंदर नृत्य करत या मिरवणूकीत सहभाग घेतला. लेजिमच्या खेळाला पंचवटीतील नागरिक व पालक वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला व मुलांचे कौतुक केले. श्रीराम विद्यालयात श्रींची स्थापना करण्यात आली होती. तरु ण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष कारभारी मुखेडकर ,सचिव बाबुराव मुखेडकर ,चंद्रकांत धोत्रे ,मुख्याध्यापक सुरेश शिंदे, प्राथ विभागाच्या मुख्याध्यापक पौर्णिमा पंडित ,आनंदा केदारे श्रीराम विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी फेटे परिधान करून सहभागी झाले होते. या मिरवणूकीत वाद्य संगत उमेश आटवणे ,सुधीर नवसारे ,हिरामण गायकवाड ,नंदकिशोर खैरनार ,रवि कोठुळे यांनी केली.