१३१ वर्षांपूर्वीचे म्हसरूळचे श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:10+5:302021-04-25T04:14:10+5:30
श्री दिगंबर जैन मंदिराची स्थापना क्षेमेंद्रकीर्ती आणि देवेंद्रकीर्ति भट्टारकांना केली होती. मंदिरात तीन वेदी आहे. मुख्य वेदीवर भगवान महावीरांची ...
श्री दिगंबर जैन मंदिराची स्थापना क्षेमेंद्रकीर्ती आणि देवेंद्रकीर्ति भट्टारकांना केली होती. मंदिरात तीन वेदी आहे. मुख्य वेदीवर भगवान महावीरांची प्राचीन प्रतिमा आहे. गजपंथा चामरलेणी क्षेत्र हे जैन परंपरेप्रमाणे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र असल्याने देधभरातून दैनंदिन शेकडो भाविक दर्शनाला येतात. त्या पहाडाची देखभाल मंदिरातून होते. गजपंथ मंदिर म्हसरूळ गावामध्ये मुख्य रस्त्यावर स्थापित आहे. मंदिराची व्यवस्था श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र (सिद्धक्षेत्र) गजपंथ म्हसरूळ विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून केली जाते.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुक्कामी थांबण्यासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. गजपंथ येथे आतापर्यंत प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज, आचार्य श्री महावीरकीर्तिजी, आचार्य श्री विद्यानंदजी, मुनिश्री तरुण सागरजी आदू साधूंचे चातुर्मास कार्यक्रम संपन्न झाले आहेत. १० वर्षांपूर्वी आचार्य श्री देवनंदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसरूळ जैन मंदिरात 7 बलभद्र आणि गजकुमार स्वामींच्या प्रतिमेचे पंचकल्याणक आहे.