श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 02:23 PM2020-01-28T14:23:03+5:302020-01-28T14:23:12+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीकुशावर्त तिर्था शेजारी असलेल्या श्रीगंगा गोदावरी मंदीरात श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ झाला आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीकुशावर्त तिर्था शेजारी असलेल्या श्रीगंगा गोदावरी मंदीरात श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यावेळी दहा दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सहा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहा दिवसात पहिल्या दिवशी गंगामाईची विधीवत धार्मिक पुजा , तिर्थराज कुशावर्त पुजन , श्रीगंगा गोदावरी पुजन करण्यात आले. सकाळी श्री दुर्गा सप्तशती, .शुक्ल यजुर्वेद पारायण पाठ तर सायंकाळीआरती मंत्र पुष्पांजली. त्यानंतर दररोज होणारे धार्मिक विधी प्रवचनकार यासाठी कोणीतरी यजमान असतो. या धार्मिक विधींमध्ये उदकशांती प्रवचन. पुरु ष सुक्त. लघुरु द्र. सत्यविनायक. सौरसुक्त देवी. अथर्वशीर्ष, नवचंडी भारतीय संस्कृती प्रवचनमाला गणपती अथर्वशीर्ष श्रीसूक्त पवमान सुक्त. विष्णूसहस्त्रनाम व गीता पठण व शेवटी प्रक्षालन पुजा आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.साक्षात परमेश्वराचा हात आपल्या मस्तकावर असतो तेव्हा सर्व बंधने तुटुन पडतात असे प्रतिपादन श्रीगंगा दशहरा महोत्सवात महर्षी व्यासांच्या अवतार चरित्राच्या कथे संदर्भात बोलतांना भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दृष्टांत प्रसंगाचे वर्णन प्रवचनकार शेखर शुक्ल यांनी केले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मप्रसंगी त्यांना गोकुळात नेण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांचे आई वडील देवकी वसुदेव यांना साखळदंडाचे बंधन होते. ती बंधने आपोआप गळून पडले असे शुक्ल यांनी सांगितले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीगंगा गोदावरी मंदीर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबक तथा बाळासाहेब दीक्षित, उपाध्यक्ष रविंद्र चांदवडकर, कार्यवाह गणेश भुजंग, कोषाध्यक्ष मोहन लोहगावकर, लक्ष्मीकांत थेटे, विजय शिखरे आदी विशेष प्रयत्न करीत आहेत.