त्र्यंबक पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी, श्यामराव गंगापूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:56 PM2018-03-14T14:56:09+5:302018-03-14T14:56:09+5:30

त्र्यंबकेश्वर -येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड.श्रीकांत प्रभाकर गायधनी व शामराव माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केली.

Shrikant Gaidhani, Shyamrao Gangaputra as Trimambak Municipal Councilor's Approved Councilor | त्र्यंबक पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी, श्यामराव गंगापूत्र

त्र्यंबक पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी, श्यामराव गंगापूत्र

Next

त्र्यंबकेश्वर -येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड.श्रीकांत प्रभाकर गायधनी व शामराव माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलाविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्वचे सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्य असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकुण सदस्य संख्या एकुण २० झाली आहे. या नियुक्तीचे भाजप नेते भावेश शिखरे , माधवराव भुजंग उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, माजी गटनेते रविंद्र सोनवणे, नगरसेविका अनिता बागुल, सागर उजे, आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, कैलास नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल फडके आदींनी स्वीकृत नगरसेवक निवडीवर मनोगत व्यक्त केले. शामराव गंगापुत्र हे शहर भाजपचे अध्यक्ष असुन त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे अनेक उपक्र म राबवून पक्षकार्य वाढविले. पक्षी काम करत असतांना पालिका निवडणुक लागली. तर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष असलेले अ‍ॅड. श्रीकांत गायधनी हे व्यवसायाने वकील असुन त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामाचा चांगला अनुभव आहे. गायधनी हे गावातील याज्ञवल्क्य सभागृह लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशा विविध पदांवर जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. यावेळी मुख्याधिकारी डॉ.चेतना केरूरे, कार्यालयीन अधिक्षक अरूण गरु ड, संजय मिसर आदी कार्यालयीन कर्मचाºयांसह नगरसेवक कैलास चोथे, भारती बदादे, विष्णु दोबाडे , सायली शिखरे, त्रिवेणी तुंगार, अशोक घागरे, कल्पना लहांगे , दिपक गिते, माधुरी भुजंग, शितल उगले, मंगला आराधी, समीर पाटणकर, संगिता भांगरे व शिल्पा रामायणे आदी उपस्थित होते.
------------------
केवळ औपचारिकता
निवडणुक झाल्यानंतर नागरिकांना प्रतिक्षा होती ती स्वीकृत नगरसेवक निवडीची. पण सन १९६५ नगरपालिका अधिनियमात नवीन तरतुद करु न स्वीकृत नगरसेवक निवड ऐवजी नगराध्यक्षांनी नियुक्ती करु न करावयाची आहे. त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेत भाजपाला निर्विवाद एकतर्फी यश मिळाल्याने पालिकेची सुत्रे आता पक्षाच्या हाती आहेत. त्यामुळेच पक्षाकडुनच स्वीकृत नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यात आली. अर्थात ती सर्वांनाच ठाउक होती. आज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरित्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला.

Web Title: Shrikant Gaidhani, Shyamrao Gangaputra as Trimambak Municipal Councilor's Approved Councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक